Breaking News

शेकापच्या धामणी आणि धोदानी गावातील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांची रविवारी (दि.20)उमेदवारी जाहीर करण्यात आली. गेली 15 वर्षे पनवेल विधानसभा मतदारसंघांमध्ये झालेल्या विकास कामांवर प्रभावित होऊन रविवारी शेतकरी कामगार पक्षाच्या धामणी आणि धोदानी येथील कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.
यामध्ये धामणी आणि धोदानी गावातील राम भस्मा, वसंत भस्मा, राम चौधरी, विष्णू चौधरी, साधू चौधरी, कमळ चौधरी, राम पारधी, राधी पारधी, आंबो पारधी, बाळू सांबरी, हरू चौधरी, फाशी पारधी, वामन चौधरी, अनंत चौधरी, बामी चौधरी, पांडू चौधरी, बाळी चौधरी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपच पक्ष प्रवेश केला.
पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्ह्याचे सरचिटणीस नितीन पाटील, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, माजी पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील, विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, सरपंच सिताराम चौधरी, अशोक पाटील, राम पाटील, शिवाजी दुर्गे आदींनी भाजपमध्ये स्वागत केले.

Check Also

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …

Leave a Reply