पनवेल : वार्ताहर : पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक राजू सोनी यांनी रोहिदासवाडा व परिसरातील दुर्दशा झालेल्या गटारे व चेंबरची दुरुस्ती स्वखर्चाने करून दिली.
गेल्या काही दिवसांपासून या परिसरातील गटारे व चेंबरची अवस्था खराब होती. या संदर्भातील अनेक तक्रारी स्थानिक रहिवाशांनी पनवेल महानगरपालिकेतील संबंधित खात्याकडे केल्या होत्या, परंतु याची दखल न घेतल्याने, तसेच सदर गटार व चेंबरची अवस्था अजून बिकट होत चालल्याने याबाबतची माहिती नगरसेवक राजू सोनी यांना देण्यात आली. तातडीने राजू सोनी यांनी त्या जागेत जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली व स्वखर्चाने कामगार लावून तेथील दुरुस्ती करून घेतली. या नागरी प्रश्नाला त्वरित प्रतिसाद देऊन काम केल्याबद्दल स्थानिक रहिवाशांनी राजू सोनी यांचे आभार मानले आहेत.