अर्चना ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त
गुढीपाडवा सणानिमित्त पनवेल शहरातील गोखले हॉलमध्ये हातमाग आणि यंत्रमाग कापडांचे भव्य प्रदर्शन आणि विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन अर्चना ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि.22) झाले.
भाऊराया हॉन्डलुमच्या संयोजनातून 22 मार्च ते 6 एप्रिलदरम्यान हे प्रदर्शन गोखले हॉलमध्ये सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत्त सुरू राहणार आहे. प्रदर्शनात कॉटन, इरकल साड्या, प्रिंटेड साड्या, ड्रेस या सारखे विविध हातमाग आणि यंत्रमाग कापडे उपलब्ध आहेत. या प्रर्दनाच्या माजी नगरसेविका नीता माळी, मोहिणी विक्रांत पाटील, संजीवनी खिलाडे, जोत्सना माळी, हमीदा परमार, सुवर्णा सजदेव, पांडुरंघ पोतन, श्रीधर कटकूर, योगेश पोतन, दिपक गुंडू, गणेश बोलके, रघु कोडम, अमर श्रीराम, मनोज म्हंत, अवधुत चव्हाण, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Check Also
‘रयत’च्या शाखाप्रमुखांची सहविचार सभा
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले मार्गदर्शन; गुणवंत शिक्षकांचा सत्कार पनवेल ः रामप्रहर वृत्तआपले कामकाज वेळच्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper