Breaking News

शिक्षिका कविता मुंबईकर मुंबई विद्यापीठात सर्वप्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्त

रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल तालुक्यातील दापोली पारगाव येथील अनंत पांडुरंग भोईर विद्यालयात शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या कविता विनायक मुंबईकर यांनी इतिहास एमए पार्ट टूच्या विभागामध्ये सर्वप्रथम येण्याचा मान पटकावला. त्यांचा सत्कार व पदवी वितरण संचालक शेफाली पांडा यांच्या हस्ते करण्यात आली. या वेळी मुंबई विद्यापीठाचे अनेक मान्यवर उपस्थित होते.

कविता मुंबईकर या कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती दशरथ ठाकूर यांच्या कन्या व कामगार नेते अ‍ॅड. विनायक मुंबईकर यांच्या पत्नी आहेत. सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply