Breaking News

सोनू सूदकडून कर्ण शर्माचे कौतुक

मुंबई ः प्रतिनिधी

कोरोनाच्या संकटात सर्वसामान्यांना बॉलीवूड अभिनेता सोनू सूदने भरघोस मदत केली. सोनूला या वेळी चेन्नई सुपर किंग्ज संघातील खेळाडू कर्ण शर्माही मदत करीत असल्याचे समोर आले आहे. सोनूने याबद्दल महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जमधील खेळाडू कर्ण शर्माचे कौतुक करून कोरोनाच्या कठीण काळात हा खेळाडू मोठे काम करीत असल्याचे सांगितले आहे.

ट्विटरच्या माध्यमातून सोनूने या वेळी कर्णचे कौतुक केले आहे. सोनूने सांगितले की, सोनू सूद फाऊंडेशनसाठी सातत्याने मदत करणार्‍या कर्ण शर्माचे आभार. कर्ण, तू पुन्हा एकदा देशातील युवाशक्तीला प्रेरित केले आहेस. तुझ्यासारख्या लोकांमुळेच वास्तवामध्ये हे जग सुंदर आणि शांतीपूर्ण होऊ शकते. त्यामुळे तुझे आभार.

सोनू सूदच्या भावूक ट्विटनंतर कर्णनेही आपली प्रतिक्रिया दिली. कर्णने म्हटले की, सोनू, तू देशाचा खरा हीरो आहेस. तू चांगले काम करीत आहेस. त्यामुळे तुझ्या या कामाला आमच्याकडून सलाम. तू असेच काम यापुढेही करीत राहा.

Check Also

आदई डोंगरावर वृक्षारोपण अभियान

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तपर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आदई डोंगरावर …

Leave a Reply