Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत नागरी समस्यांबाबत महत्त्वपूर्ण बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्त
रोहिंजन, घोट, कोयनावेळे आणि खुटुकबंधन या गावातील नागरिकांना भेडसावणार्‍या विविध नागरी सुविधांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी पनवेल महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांसमवेत एक महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी (दि.20) आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी संबंधित गावातील समस्या महानगरपालिका अधिकार्‍यांसमोर प्रभावीपणे मांडल्या. या समस्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन, या समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी पालिका स्तरावर तातडीने प्रयत्न करण्याचे आदेश आमदारांनी दिले. तसेच, येत्या काळामध्ये या समस्यांवर समाधानकारक उपाय काढून त्या मार्गी लावण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
या बैठकीला माजी नगरसेवक अनिल भगत, गणेश कडू, आयुक्त मंगेश चितळेकर, अतिरिक्त आयुक्त गणेश शेट्टे, शहर अभियंता संजय कटेकर, तळोजा मजकूरचे माजी सरपंच संतोष पाटील, विनेश कदम, नितेश पाटील यांच्यासह पनवेल महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी आणि ग्रामस्थ
उपस्थित होते.

Check Also

उलवे नोडमध्ये रविवारी महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा सांस्कृतिक कार्यक्रम

भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे होणार वाटप पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि …

Leave a Reply