पनवेल : रामप्रहर वृत्त
रोहिंजन, घोट, कोयनावेळे आणि खुटुकबंधन या गावातील नागरिकांना भेडसावणार्या विविध नागरी सुविधांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी पनवेल महानगरपालिकेच्या अधिकार्यांसमवेत एक महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी (दि.20) आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी संबंधित गावातील समस्या महानगरपालिका अधिकार्यांसमोर प्रभावीपणे मांडल्या. या समस्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन, या समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी पालिका स्तरावर तातडीने प्रयत्न करण्याचे आदेश आमदारांनी दिले. तसेच, येत्या काळामध्ये या समस्यांवर समाधानकारक उपाय काढून त्या मार्गी लावण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
या बैठकीला माजी नगरसेवक अनिल भगत, गणेश कडू, आयुक्त मंगेश चितळेकर, अतिरिक्त आयुक्त गणेश शेट्टे, शहर अभियंता संजय कटेकर, तळोजा मजकूरचे माजी सरपंच संतोष पाटील, विनेश कदम, नितेश पाटील यांच्यासह पनवेल महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी आणि ग्रामस्थ
उपस्थित होते.
Check Also
दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार
रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …
RamPrahar – The Panvel Daily Paper