पनवेल : रामप्रहर वृत्त
घोट गावाला स्मार्ट सिटी बनवण्यासाठी तसेच परिसरातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्याचे काम आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष करीत आहे. त्यामुळे येणार्या काळात नागरिकांचे सर्व प्रश्न मार्गी लावून त्यांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भाजप काम करेल, अशी ग्वाही पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी घोट येथे विविध विकासकामांच्या शुभारंभावेळी केले.
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्या अंतर्गत भाजपचे युवा नेते नितेश पाटील यांच्या वतीने घोट गावातील नागरिकांना मोफत छत्री आणि परिसरातील सोसायट्यांना डस्टबिन वाटप कार्यक्रम शुक्रवारी (दि. 20) आयोजित करण्यात आला होता तसेच या वेळी घोट गावाजवळ सुमारे 12 कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या पुलाचे उद्घाटन, 12 कोटी 62 लाख रुपयांच्या निधीतून साकारण्यात येणार्या कोयनावेळे ते आरटीओपर्यंतच्या रस्ता डांबरीकरणाच्या कामाचे आणि सुमारे नऊ कोटी पाच लाख रुपयांच्या निधीतून बांधण्यात येणार्या स्मशानभूमीचे भूमिपूजन करण्यात आले. या कामांचा शुभारंभ भाजपचे ज्येष्ठ नेते अरुणशेठ भगत आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमास भाजपचे तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, माजी नगरसेवक हरेश केणी, संतोष भोईर, खारघर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील, पनवेल उत्तर मंडळ अध्यक्ष दिनेश खानावकर, चिटणीस आशिष कडू, नवनाथ पाटील, माजी सरपंच संतोष पाटील, निर्दोष केणी, भाजप नेते नितेश पाटील, हालोजी निघुकर, बाळकृष्ण पाटील, मोहन पाटील, शिवराम निघुकर, हरिभाऊ पाटील, एकनाथ पाटील, मोहन निघुकर, रमेश पाटील, दिनेश केणी, रविकांत म्हात्रे, नंदुकुमार म्हात्रे, सुरेश पोरजी, मंदार कदम, विनेश कदम, सुनील कदम, जयराम कदम, विजय कदम, गणेश निकोडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
Check Also
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयकाला आमदार प्रशांत ठाकूर यांचे जोरदार समर्थन
विधीमंडळ सभागृहात जाहीर केला पाठिंबा मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यात जबदस्तीने किंवा प्रलोभनाव्दारे धर्मांतर रोखण्यासाठी सरकारने …
RamPrahar – The Panvel Daily Paper