पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील खानाव-महाळुंगी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक गुरुवारी (दि. 26) झाली. या निवडणुकीत भाजपच्या चंदा निलेश वारदे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे. याबद्दल भाजपचे ज्येष्ठ नेते अरुणशेठ भगत यांनी चंदा वारदे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या वेळी भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, पनवेल पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील, एकनाथ देशेकर, अमित देशमुख, सुनील पाटील, नरेश पाटील, नामदेव जमदाडे, रमेश पाटील, बाबू भोईर, संजय तवले, सुनील फराड, गणेश तातरे, आत्माराम पाटील, बळीराम भोईर, हरिश्चंद्र वारदे, विलास भोपी, समीर मुंढे, दीपक तवले, मेघनाथ वारदे, रमेश वारदे, गुरूनाथ पाटील, शशिकांत दिसले, योगेश पाटील, प्रशांत बोलाडे, बाळाराम पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी चंदा वारदे यांचे अभिनंदन करून वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Check Also
भजनी मंडळांना मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते साहित्याचे वितरण
पनवेल : रामप्रहर वृत्तभजन परंपरेचे जतन, संवर्धन व्हावे आणि हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहचावा या …
RamPrahar – The Panvel Daily Paper