Breaking News

क्रिकेटच्या मैदानावर डॉक्टरांची फटकेबाजी; पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनची क्रीडा स्पर्धा उत्साहात

पनवेल : वार्ताहर

कोरोनाच्या बिकट परिस्थितीत रुग्णांची सेवा करणार्‍या कोविड योद्ध्यांना दोन घटका एकत्रित आणण्यासाठी पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी रायगड जिल्ह्यातील डॉक्टरांची क्रिकेटच्या मैदानावर फटकेबाजी पाहावयास मिळाली. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध डॉ. गिरीश गुणे, डॉ. बी. जे. बिरमोळे, पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती सभापती सुशीला घरत, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी डॉ. गुणे यांनी एकत्रित आलेल्या डॉक्टरांचे कौतुक केले.स्पर्धेत टेनिस क्रिकेटसह महिला डॉक्टरांसाठी बॉक्स क्रिकेट (अंडरआर्म क्रिकेट) तसेच बॅडमिंटन सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी रायगड जिल्ह्यातील रोहा, कर्जत, पेण, रसायनी, पनवेल, मुरूड अशा संघांमध्ये साखळी सामने रंगले. कोरोना संसर्गामुळे गेले संपूर्ण वर्षभर अत्यंत व्यस्त असलेल्या डॉक्टरांनी क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटत आपल्या अंगी असलेले कलागुण या वेळी दाखविले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. वैभव मोकल, सचिव डॉ. रवींद्र राऊत, उपाध्यक्ष डॉ. सागर चौधरी, डॉ. सागर ठाकूर, डॉ. संदेश बहादकर, डॉ. यासिन शेख, डॉ. शिरीष जोशी, डॉ. प्रकाश पाटील, डॉ. गजेंद्र सिलीमकर, डॉ. सिद्धार्थ कौशिक, डॉ. सचिन पाटील, डॉ. सोनल सेठ, डॉ. अनघा चव्हाण आदींनी मेहनत घेतली.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply