Breaking News

पनवेल महाळुंगीतील शेकाप कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलल्या विविध कल्याणकारी योजना तसेच सक्षम नेतृत्वावर प्रभावित होऊन पनवेलमधील महाळुंगी आदिवासीवाडीतील शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे. सर्व प्रवेशकर्त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षात स्वागत करून त्यांनी जो विश्वास ठेवून पक्षप्रवेश केला आहे तो सार्थ ठरेल, असा विश्वास दिला.
पनवेल शहरातील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमाला तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, विभागीय अध्यक्ष सुनील पाटील, प्रमोद भगत, द्वाराकानाथ बोलाडे, रघुनाथ पाटील, शशिकांत दिसले, सरपंच चंदाताई वारदे, योगेश पाटील, प्रशांत बोलाडे, आत्माराम पाटील, उमेश वारदे आदी उपस्थित होते.
या वेळी महाळुंगी आदिवासीवाडीतील शेकापचे राम नाईक, लहू वाघे, बाळू वाघे, राजेश वाघे, नरेश नाईक, राकेश नाईक, विनोद वाघे, सुनिता वाघे, अंजना वाघे, प्रकाश वाघे, लक्ष्मी वाघे, नितेश वाघे, सुनिता वाघे, महेश वाघे, शारदा वाघे, द्रुपदा वाघे, शुभांगी वाघे, सुमन वाघेे, कविता वाघे, मुक्ता नाईक, चंद्रा नाईक, शानुबाई गोंधळी, राजेश वाघे, हितेश नाईक, ज्ञानेश्वर नाईक यांनी विकासाचे ‘कमळ’ हाती घेतले. या सर्वांचे भाजपमध्ये स्वागत करण्यात आले.

Check Also

भारतमाता चित्रपटगृहाशी माझं नातं अगदी वेगळं…

भारतमाता चित्रपटगृहाने छान कात टाकली. ते आजचं झाले.बदल हा होतच असतो, तो व्हायलाही हवा. काही …

Leave a Reply