खारघर ः रामप्रहर वृत्त
खारघर येथील गोल्डन कॉईन वाईन मार्टची परवानगी रद्द करावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर आणि स्थानिक संघर्ष समितीने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे निवेदनाद्वारे केली होती. ही बाब अधिक गांभीर्याने घेत राज्य उत्पादन शुल्क अधिकारी आणि खारघर संघर्ष समिती यांची संयुक्त बैठक शुक्रवारी (दि. 27) खारघरमध्ये झाली. या बैठकीला आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील, आमदार विक्रांत पाटील, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक रवीकिरण कोले, उपअधीक्षक श्री. भूतकर, निरीक्षक बी.डी. फणसेकर तसेच इतर मान्यवर व खारघर संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
गोल्डन कॉईन वाईन मार्ट हे नवीन वाईन शॉप खारघर सेक्टर 6मध्ये उघडण्यात आले आहे. खारघर नशामुक्त व्हावे यासाठी खारघर संघर्ष समिती मागील अनेक वर्षांपासून आंदोलन, जनजागृती करत आहे. अशात या वाईन शॉपमुळे अनेक तरुण व्यसनाच्या आहारी जाऊ शकतात. हेच थांबवण्यासाठी वाईन शॉपला चुकीच्या पद्धतीने दिलेली मान्यता रद्द करावी, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. त्यावर या संदर्भात चौकशी करून पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले.
Check Also
दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार
रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …
RamPrahar – The Panvel Daily Paper