रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटीक)चा निर्धार
पनवेल ः वार्ताहर
पनवेल विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांनी निवडणुक अर्ज दाखल केल्यानंतर त्यांना कोणत्याही परिस्थितीत विजयी करून हॅट्रीक साधायचीच या निश्चयाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटीक) पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते प्रचारास सज्ज झाले आहेत.
महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटीक) पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली शहर व तालुका महिला आघाडी, इतर आघाड्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते एक दिलाने व विजयी करण्याच्या निश्चयाने कामाला लागले असून ज्याप्रमाणे निवडणुक अर्ज भरताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटीक) पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी शेकडोंच्या संख्येने सहभागी झाले होते. त्याच ताकदीने घराघरात जाऊन प्रशांत ठाकूर यांचा प्रचार करून त्यांना लाखांच्या वर मताधिक्याने निवडून आणण्याचा संकल्पच कार्यकर्त्यांनी सोडला आहे.