आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन खांदा कॉलनीमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल परिसराचे चित्र हे विमानतळ सुरू झाल्यानंतर संपुर्ण बदलणार आहे. शिक्षणासोबत विकासाच्या, रोजगाराच्या तसेच स्वयंरोगाराच्या अनेक संधी निर्माण होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील काळात शिक्षणाच्या आणि रोजगाराच्या बाबतीत कोणतीही समस्या जाणवली तर ती समस्या सोडवण्यासाठी भाजप तुमच्या सोबत आहे, अशी ग्वाही आमदार
प्रशांत ठाकूर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभावेळी दिली तसेच विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
खांदा कॉलनी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आणि माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ रविवारी आयोजीत करण्यात आला होता. हा सोहळा खांदा कॉलनीमधील श्री कृपा हॉलमध्ये झाला. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे, भाजप नेते भिमराव पोवार, मोतीलाल कोळी, रामनाथ पाटील, गोपीनाथ मुंडे, शांताराम महाडीक, अरविंद्र जाधव, सचिन गायकवाड, अविनाश गायकवाड, दिपक जांभळे, विजयकुमार पाटील, जितेंद्र माने, दत्तात्रय खंडागळे, भोसले मॅडम, स्वारी नांगरे, युवराज बेडसे, डॉ. आषा मुंडे, विद्या जाधव, स्नहेल सपकाळ, सुनिता मोरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper