उरण : वार्ताहर
उरणमधील यू.ई.एस. स्कूल आणि महाविद्यालयात बुधवारी (दि 27) ‘मराठी राजभाषा दिवस’ उत्साहात साजरा करण्यात आला. यू.ई.एस. संस्थेचे उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, मानद सचिव आनंद भिंगार्डे, सहसचिव चंद्रकांत ठक्कर, प्राचार्या प्रधान मॅडम, तसेच सिनिअर कॉलेजचे प्रभारी प्राचार्य, स्कूल व ज्यु. कॉलेजच्या प्राचार्या, पूर्वप्राथमिक व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका, सिनिअर कॉलेजचे एचओडी, प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या पर्यवेक्षिका यांचे विद्यार्थ्यांनी लेझीम व ढोलताशांच्या गजरात स्वागत व औक्षण केलं. त्यानंतर सर्व मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून ज्ञानेश्वरीची पूजा केली. त्यानंतर व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे, तसेच व्यासपीठासमोर उपस्थित असलेले सर्व पीटीए सदस्य ह्यांना गुलाबपुष्प देण्यात आले. ‘मराठी दिवसा’च्या कार्यक्रमाची सुरुवात माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हणून केली. त्यानंतर स्वागत गीत, ईशस्तवन उखाणे व तराणे आणि लावणी नृत्य झाले, तसेच आनंदी गोपाळ ह्या विषयावर एक सुंदर अशी नाटिका सादर करण्यात आली.