Breaking News

अनधिकृत भोंग्यांविरोधात ठोस पावले उचला!

भाजप नेते किरीट सोमय्या यांची पनवेल दौर्‍यात पोलिसांकडे मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त
धर्माच्या नावाखाली कोणतीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. कायदा व सुव्यवस्था पाळलीच पाहिजे, असे ठाम मत भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सोमवारी (दि. 21) पनवेल दौर्‍यादरम्यान व्यक्त केले. अनधिकृत भोंग्यांमुळे वाढणार्‍या ध्वनीप्रदूषणावर आणि नागरिकांच्या नाराजीवर त्यांनी चिंता व्यक्त करत प्रशासनाने या संदर्भात ठोस पावले उचलावीत, अशी मागणी केली.
महाराष्ट्र भोंगामुक्त मोहिमेला गती देण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासोबत पनवेलचा दौरा केला. या दौर्‍यात त्यांनी खारघर पोलीस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षक अजय कांबळे, कळंबोली पोलीस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कोते आणि तळोजा पोलीस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षक प्रवीण भगत यांची भेट घेत शहरातील अनधिकृत भोंगे हटवण्याची मागणी केली.
किरीट सोमय्या यांच्या मागणीला पोलिसांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून येत्या आठ दिवसांत कारवाई करून अनधिकृत भोंगे बंद करण्याचे आश्वासन दिले आहे.
या वेळी भाजपचे जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, खारघर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील, पनवेल उत्तर मंडळ अध्यक्ष दिनेश खानावकर, माजी नगरसेवक अभिमन्यू पाटील, नरेश ठाकूर, बबन मुकादम, गुरूनाथ गायकर, माजी नगरसेविका नेत्रा पाटील, कळंबोली शहर मंडळाचे माजी अध्यक्ष रविनाथ पाटील, खारघर महिला मोर्चा अध्यक्ष साधना पवार, मंडळ सरचिटणीस दीपक शिंदे, उपाध्यक्ष किरण पाटील, निर्दोष केणी, अमर उपाध्याय, वासुदेव पाटील, किर्ती नवघरे, शैलेंद्र त्रिपाठी, युवा मोर्चा अध्यक्ष नितेश पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांना महाराष्ट्र प्रदेश भाजप चिटणीसपदाची मोठी जबाबदारी

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा …

Leave a Reply