Breaking News

समाजाला उपयोगी पडेल असे कार्य आपण करावे -लोकनेते रामशेठ ठाकूर

आरोग्य तपासणी शिबिरावेळी मोलाचा सल्ला
पनवेल : रामप्रहर वृत्त
दुसर्‍याच्या उपयोगी पडेल असे कार्य आपण करायाला पाहिजे, असे आवाहन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पनवेल शहरातील रोहीदास वाड्यात आयोजीत करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबीरावेळी केले. तसेच पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य निलेश पाटील आणि माजी नगरसेविका रेणुका मोहकर यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्यसाधून उत्कृष्टपणे आयोजन केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.
पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये विविध मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था आणि भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 19 यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबीराचा शुभारंभ पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाला. तसेच या कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि ज्येष्ठनेते जे.एम.म्हात्रे यांनी भेट देऊन शिबीराची पाहणी केली तसेच आयोजकांचे कौतुक केले.
या शिबिरात नायर हॉस्पिटल आणि सुश्रुषा हार्ट केअर सेंटर यांच्या सहकार्याने विविध आरोग्य तपासण्या आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये सुश्रुषा हार्ट केअर सेंटरच्यावतीने हृदय तपासणी, ईसीजी, शुगर तपासणी, बी.पी. तपासणी, ईको तपासणी करण्यात आली. तसेच, रेशन कार्ड व आधार कार्डवर एनजीओप्लास्टी मोफत करण्यात येणार आहे. तर नायर हॉस्पिटलच्या वतीने मोफत नेत्र तपासणी, मोतिबिंदू तपासणी करण्यात आली.
दरम्यान, या वेळी श्री साई ब्लड बँकच्यावतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला लाभला. हे शिबिर रविवारी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत रोहिदास वाडा येथील समाज मंदिरात झाले. या कार्यक्रमाचे आयोजक निलेश पाटील आणि माजी नगरसेविका रेणुका मोहोकर यांनी केले होते. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, ज्येष्ठनेते जे.एम.म्हात्रे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा सरचिटणीस चारुशीला घरत, पनवेल पंचायत समितीच्या माजी सदस्या रत्नप्रभा घरत, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील, माजी नगरसेवक अनिल भगत, प्रभाकर बहिरा, माजी नगरसेविका दर्शना भोइर, हेमलता म्हात्रे, राजश्री वावेकर, प्रिती जॉर्ज, डॉक्टर सुरेखा मोहोकर, सारीका भगत, भाजप कामगार मोर्चाचे प्रदेश सचिव संजय भगत, पनवेल मंडळ अध्यक्ष सुमीत झुंझारराव, प्रविण मोहोकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply