पनवेल : रामप्रहर वृत्त
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आपल्या परिसरात विकासाची कामे पूर्ण करून नागरिकांना सुविधा देण्यासाठी भारतीय जनता पक्ष कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांनी विहीघर येथे सामाजिक सभागृहाच्या उद्घाटनावेळी केले. त्याचप्रमाणे महिलांनी रस्त्यासंदर्भात केलेली मागणी लवकरच पूर्ण करणार असल्याचे आश्वासित केले.
पनवेल तालुक्यातील विहीघर येथे सामाजिक सभागृह बांधण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून निधी मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार 25-15 या योजनेतून 16 लाख 80 हजार 673 रुपये खर्च करून सामाजिक सभागृह बांधण्यात आले आहे. या सभागृहाचे उद्घाटन भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या हस्ते सोमवारी
(दि. 25) झाले. त्या वेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, अनुसूचित जाती मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अमित जाधव, पनवेल पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील, तालुका चिटणीस यतीन पाटील, उपाध्यक्ष महेश पाटील, माजी उपसरपंच बाळाराम पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुनील पाटील, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, तालुका सरचिटणीस विश्वजीत पाटील, बूथ अध्यक्ष संदेश फडके, अक्षय पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
Check Also
तीनही निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेमुळे राहुल गांधींचा फेक नॅरेटिव्ह उद्ध्वस्त!
‘वोटचोरी’चा आरोप करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे; आमदार प्रशांत ठाकूर यांचा विरोधकांवर घणाघात पनवेल : रामप्रहर वृत्ततीनही …
RamPrahar – The Panvel Daily Paper