पनवेल : रामप्रहर वृत्त
कोशिश फाऊंडेशन आणि पनवेल महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आमदार प्रशांत ठाकूर चषक वक्तृत्व स्पर्धा 2025ची महाअंतिम फेरी सोमवारी (दि. 25) उत्साहात झाली. यामध्ये पनवेल क्षेत्रातून तब्बल 16,887 स्पर्धकांमधून निवडलेले 713 विद्यार्थी सहभागी झाले होते.
सीकेटी कॉलेज खांदा कॉलनी आणि लोकनेते दि.बा. पाटील विद्यालय पनवेल या ठिकाणी महाअंतिम फेरी झाली. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे माजी शहराध्यक्ष अनिल भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी नगरसेवक अजय बहिरा, महापालिकेचे शिक्षण अधिकारी रमेश चव्हाण, नवीन पनवेल मंडळ अध्यक्ष दशरथ म्हात्रे, सांस्कृतिक सेल जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, अॅड. चेतन जाधव, स्पर्धा प्रमुख तथा कोशिश फाऊंडेशनचे उपाध्यक्ष मयुरेश नेतकर, अॅड. चिन्मय समेळ, नितेश पाटील, अक्षय सिंग आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी उत्साहाने अनेक सामाजिक व बौद्धिक विषयांवर आपली मते मांडली. यामध्ये माझा आवडता सुपरहीरो, जर मी पक्षी असतो, माझा आवडता विज्ञाननायक, स्वच्छ भारत प्लास्टिकमुक्त भारत, इंटरनेट- वरदान की शाप?, कृत्रिम बुद्धिमत्ता-धोका की वरदान? वेळेचे महत्त्व, अपयश हे यशाचे पायरी आहे असे विचारांना आकार देणारे विषय होते.
स्पर्धकांच्या भाषणांमधून विद्यार्थ्यांची सृजनशीलता, संवेदनशीलता आणि वक्तृत्वकौशल्य ठळकपणे दिसून आले.
महाअंतिम फेरीत पनवेल व आसपासच्या नामांकित शाळांचा भव्य सहभाग होता. त्यामध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल कामोठे, सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर शाळा उलवे, लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल कामोठे, सुधागड एज्युकेशन सोसायटी कळंबोली, सुषमा पाटील विद्यालय कामोठे, सीकेटी विद्यालय नवीन पनवेल, पनवेल महापालिका अंतर्गत शाळा, जिल्हा परिषदेच्या शाळा अशा तालुक्यातील अनेक शाळांचा समावेश होता. महाअंतिम फेरीत उत्कृष्ट कामगिरी करणार्या विद्यार्थ्यांना चषक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
वक्तृत्व स्पर्धेत 16,800पेक्षा जास्त स्पर्धक लाभणे हा मोठा रेकॅार्डच असेल. कोशिश फाऊंडेशनच्या वतीने आयोजित ही आमदार प्रशांत ठाकूर चषक वक्तृत्व स्पर्धा महाराष्ट्रात क्रमांक 1ची असू शकेल. आयोजकांचे अभिनंदन!
-नितीन पाटील, जिल्हा सरचिटणीस, भाजप
कोशिश फाऊंडेशनने आयोजित केलेल्या आमदार प्रशांत ठाकूर चषक वक्तृत्व स्पर्धेचा दर्जा फारच मोठा आहे. यामध्ये हजारो विद्यार्थ्यांना संधी मिळाली आणि या कार्यक्रमामध्ये आम्हालादेखील संधी दिली, त्याबद्दल आयोजकांचे धन्यवाद!
-अनिल भगत, माजी शहराध्यक्ष, भाजप
Check Also
एक मुलाखत : यशस्वी माजी विद्यार्थ्याची
शालेय विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मुलाखतीत लोकनेते रामशेठ ठाकूर झाले भावूक पनवेल : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper