पनवेल : रामप्रहर वृत्त
शिक्षण हे आवश्यक आहेच, शिवायकला क्षेत्रही महत्त्वपूर्ण आहे. विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी होण्यासाठी आपल्यात चांगले गुण आणि ध्येयवृत्ती असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रिटघर (ता.पनवेल) येथे केले.
रयत शिक्षण संस्थेच्या रिटघर येथील श्री भैरवदेव विद्यालय व लोकनेते रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा 138वा जयंती सोहळा आणि गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण समारंभ लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि. 29) उत्साहात झाला. त्या वेळी ते बोलत होते. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी तसेच विद्यालयाला काही कमी पडू द्यायच नाही हे धोरण आम्ही आधीपासूनच ठरवून ठेवले आहे, असे त्यांनी सांगितले.
या निमित्त आयोजित रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या करण्यात आले. त्यानंतर विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या, मागील वर्षी पाचवी ते बारावी परीक्षेत प्रथम तीन आलेल्या तसेच जिल्हा, तालुका, विभागस्तरीय कुस्ती स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यालयातील विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला.
या सोहळ्याला संस्थेचे जनरल बॉडी सदस्य वाय.टी. देशमुख, एम.के.कोंगेरे, व्ही.यु. जगताप, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य सुभाषशेठ भोपी, बाळाराम भोपी, बळीराम भोपी, राजेश भोपी, वंदना भोपी, प्रल्हाद भोपी, वासुदेव भोपी, दीपक पाटील, महेश पाटील, विष्णू भगत, राजन भगत, प्रल्हाद भोपी, विश्वनाथ भोपी, नवनाथ भोपी, कमळाबाई वाघमारे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.बी. कारंडे यांनी केले. आराध्या भगत, नव्या जांभळे, अशोक पाटील यांनी कर्मवीर अण्णांच्या जीवन चरित्रावर भाषण केले. या वेळी स्कूल कमिटी सदस्य दीपक पाटील, जयवंत भोपी आणि प्रल्हाद भोपी यांनी विद्यार्थांना खाऊचे वाटप केले.
Check Also
नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’चे नाव द्या; भाजपचे लक्षवेधी आंदोलन
पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्व. दि.बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी …
RamPrahar – The Panvel Daily Paper