Breaking News

प्रमाणपत्र मिळविण्यासाठी वैद्यकीय कार्यालयासमोर झुंबड

पनवेल : वार्ताहर – लॉकडाऊनच्या काळात प्रवासी वाहतूकीने राज्य किंवा राज्याबाहेर जाणार्‍यांंना वैद्यकीय प्रमाणपत्रे आवश्यक असल्याने गेल्या तीन दिवसांपासून पनवेल परिसरात वैद्यकीय कार्यालयासमोर ही वैद्यकीय प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात परराज्यातील नागरिकांनी गर्दी केली आहे. परंतु या वेळी सोशल डिस्टन्सिंगचा विसर पडल्यासारखे दिसून आल्याने यांच्या मार्फत मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादूर्भाव होण्याची भीती वर्तविली जात आहे.

लॉकडाऊनमुळे अनेकांना आपल्या मूळ गावी, घरी जाण्याचे वेध लागले आहेत. राज्य शासनाने तशा प्रकारची मुभा दिली आहे. त्याचप्रमाणे वाहनांची उपाययोजना केल्याने परराज्यात राहणारे रहिवासी आता आपल्या घरी परतण्यास सज्ज झाले आहेत. परंतु या काळामध्ये नोंदणीकृत डॉक्टरांकडून कोरोना विषाणूंची लक्षणे नसल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार सदर द्यकीय प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी, आवश्यक ते अर्ज भरण्यासाठी भरलेले अर्ज संबंधित पोलीस ठाण्यात जमा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पनवेल परिसरातील परप्रांतीय रस्त्यावर बिनधास्तपणे फिरताना दिसत

असून अनेक जण तोंडाला मास्कही लावत नाहीयेत.

तसेच उघड्यावर थुंकणे, पाण्याने चूळ भरणे, फॉर्मसाठी गर्दी करणे, झेरॉक्स काढण्यासाठी गर्दी करणे, तसेच इतर बाबींची विचारणा करण्यासाठी शासकीय कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणांत त्यांची आता गर्दी दिसू लागली आहे. अशावेळी त्यांना सोशल डिस्टन्सिंगचा सुद्धा विसर पडला आहे. त्यामुळे अचानकपणे कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव पनवेल परिसरात वाढण्याची भीतीसुद्धा व्यक्त केली जात आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply