नागरिकांच्या चेहर्‍यावरील समाधानामुळे आम्हाला आनंद -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त
दिवाळी फराळाचे साहित्य कमी दरात उपलब्ध झाल्याने नागरीकांच्या चेहर्‍यावर समाधन पहायला मिळते आणि त्यामुळे आम्हाला आनंद मिळतो, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी कळंबोली येथे केले.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून दिवाळी सणानिमित्त कळंबोली येथे बाजारभावापेक्षा स्वस्त दरात दिवाळी फराळाचे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा प्रिया मुकादम आणि माजी नगरसेवक बबन मुकादम यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात येत असून त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी या उपक्रमाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या तसेच जिल्हाध्यक्षा प्रिया मुकादम आणि माजी नगरसेवक बबन मुकादम यांच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.
कळंबोली येथील जय अपार्टमेंट येथे या उपक्रमा अंतर्गत खोबरे, शेंगदाणे, रवा, मैदा, चणाडाळ, साखर, गूळ, पोहे, जेवणाचे तेल आणि डाळ यांसारख्या वस्तू बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. हा उपक्रम 12 ते 15 ऑक्टोबरदरम्यान सकाळी 10 ते 5 सायंकाळी या वेळेत सुरू राहणार असून, जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या वेळी भाजपचे कळंबोली अमर पाटील, माजी नगरसेवक बबन मुकादम, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा प्रिया मुकादम, विजय गर्जे, दिलीप बिष्ट, मनीष तिवारी, दीपक सत्ते, दादू पाटील, शरद कुमार, अमर जैसवाल, विद्या फरांदे, गणेश रणदिवे, कविता चव्हाण, गौरी कोरडे, अतुल वाघमारे, मेघा मुकादम, अभिषेक दळवी, लक्ष्मण जायबाय, दत्ता राम, अतुल वाघमारे, विवेक लंबादे, राजेश गुप्ता, गणेश वाघमारे, दीलीप खटके, रत्नाकर जावीर आदी उपस्थित होते.

Check Also

Test post title

Test post content

Leave a Reply