पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिका आयोजित आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ प्रायोजित सुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल असलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन पनवेलमध्ये करण्यात आले आहे. शहरातील वडाळे तलाव येथे मंगळवारी (दि. 21) सकाळी 5.30 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यंदाचे हे नववे वर्ष असून या वेळी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे आपल्या सुमधुर आवाजात सुश्राव्य गीतांची मैफल सादर करणार आहेत.
या कार्यक्रमासाठी प्रवेश निःशुल्क असून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळ कार्यालय मार्केट यार्ड पनवेल, आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल, अमोल स्टेशनरी टिळक रोड पनवेल येथे मोफत प्रवेशिका उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
अधिक माहितीसाठी अभिषेक पटवर्धन (8668332159), गणेश जगताप (9870116964), वैभव बुवा (9029410699) किंवा आदित्य उपाध्ये (9324603473) या क्रमांकावर संपर्क साधावा तसेच या सुरेल मैफलीचा संगीत रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. दीपावलीच्या आनंददायी वातावरणात बेला शेंडे यांच्या सुरेल स्वरांचा जल्लोष अनुभवण्याची संधी पनवेलकरांना लाभणार आहे.
Check Also
हॉटेल सी रॉकचे चित्रपटसृष्टीशी नातेसंबंध…
चित्रपटाच्या जगात एवढे, असे आणि इतके रंग एकमेकांत मिसळले गेले आहेत की त्याचा शोध अजिबात …
RamPrahar – The Panvel Daily Paper