Breaking News

पनवेल मनपाकडून भोकरपाडा प्रकल्पाची पाहणी

लवकरच पाणीपुरवठा होणार सुरळीत

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिका क्षेत्रामधील पनवेल शहर आणि नवीन पनवेल वसाहतीतील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासत आहे. या पार्श्वभूमीवर मनपा सभागृह नेते परेश ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 3) महाराष्ट्र जीवन प्राधीकरणच्या भोकरपाडा येथील वॉटर ट्रिटमेंट प्लांटला भेट देऊन पाहणी केली तसेच अधिकार्‍यांशी चर्चा केली. या वेळी स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी आणि नगरसेवक अनिल भगत उपस्थित होते.
या संदर्भात अधिक माहिती देताना सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सांगितले की, पनवेल व नवीन पनवेलला पाण्याची कमतरता भासत असल्याने आज आम्ही एमजेपीच्या भोकरपाडा येथील प्लांटला भेट देऊन पाहणी केली तसेच अधिकार्‍यांशी चर्चा केली. त्यांनी आम्हाला माहिती दिली. त्यानुसार येथे एमजेपीची 6500 मिटरची जलवाहिनी आहे. फक्त 10 मिटर अंतराच्या जोडणीचे काम मालकी हक्क व पेमेंटच्या वादामुळे बाकी आहे. यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जात असून, पनवेलकरांना येत्या 10 ते 15 दिवसांत एक्स्प्रेस फीडरची सुविधा प्राप्त होऊन पाण्याची कमतरता कमी होईल. ते पाहता पाण्याचा जो तुटवडा जाणवतोय तो कमी होईल अशी आपण सर्व जण मिळून आशा करू या!

Check Also

केंद्र सरकारच्या लोकाभिमुख योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवा -मंत्री आदिती तटकरे

माणगाव : प्रतिनिधी महायुतीचे रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ श्रीवर्धन विधानसभा …

Leave a Reply