पनवेल : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोडमधील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला संस्थेचे सचिव डॉ. विकास देशमुख यांनी सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी संपूर्ण स्कूलची पाहणी केली तसेच स्कूलच्या कामाचा, प्रगतीचा, मराठी माध्यम विभागाचा आढावा घेतला आणि स्कूलच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे ज्येष्ठ सदस्य व थोर देणगीदार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सचिव डॉ. विकास देशमुख यांचे स्वागत व सन्मान केला. या वेळी स्कूलच्या मुख्याध्यापिका मुक्ता खटावकर, सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालय मराठी माध्यमाचे मुख्याध्यापक दीपक भरणुके, संस्थेचे रायगड विभागीय पीआरओ बाळासाहेब कारंडे, भाजपचे उलवे नोड अध्यक्ष निलेश खारकर, धीरज ओवळेकर, शिवाजी अहिरकर, हर्षल फडके आदी उपस्थित होते.
Check Also
पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …
RamPrahar – The Panvel Daily Paper