पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील आदई गावामध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विकास निधीमधून अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या हस्ते सोमवारी (दि.24) झाले.
पनवेल विधानसभा मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासाची कामे मार्गी लागुन नागरीकांना दिलासा देण्याचे काम होत आहे. त्यानुसार आदई गावामध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या 20 लाख रुपयांच्या विकासनिधीमधून अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार असून या कामाचे भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन झाले.
यावेळी भाजपचे पनवेल पूर्व मंडळ अध्यक्ष भुपेंद्र पाटील यांनी, भारतीय जनता पक्षाने विकासात्मक दृष्टीकोन समोर ठेऊन जनतेची सेवा करते, मात्र विरोधक हे फक्त थापा मारण्याचे काम करतात असे म्हणाले.
या कामाच्या भूमिपूजनावेळी भाजपचे पनवेल पूर्व मंडळ अध्यक्ष भुपेंद्र पाटील, धर्माशेठ काकडे, महादू शेळके, भाई रामा पाटील, एकनाथ मोकल, जगदीश शेळके, विलास शेळके, आकाश मोकल, श्रीचन भंडारी, जनार्दन पाटील, मंगेश भोपी, पद्माकर शेळके, राजेश काकडे, रोहित पाटील, दीपक शेळके, राजेश शेळके, ज्ञानेश्वर पाटील, राहुल पाटील, एकनाथ शेळके, कैलास पाटील, किरण शेळके, अभिमन्यू भंडारी, मुकेश मोकळ, प्रशांत मोकल, सुरज म्हात्रे, संजय पारंगे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
Check Also
आमदार प्रशांत ठाकूर यांना महाराष्ट्र प्रदेश भाजप चिटणीसपदाची मोठी जबाबदारी
पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा …
RamPrahar – The Panvel Daily Paper