Breaking News

अनेक विकासाची कामे आपल्या परिसरात होतील -अरुणशेठ भगत

चिखले येथे तीन कोटींच्या कामांचे भूमिपूजन आणि जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनात पार्टी ही दिलेला शब्द पाळणारी पार्टी आहे. त्यामुळे येणार्‍या काळात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासाची कामे आपल्या परिसरार होतील, अशी ग्वाही भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांनी चिखले येथे सुमारे तीन कोटी रुपयांच्या विकास कामांच्या भुमीपूजन आणि जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनावेळी दिली.
पनवेल तालुक्यात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामांचा झंझावात सुरू आहे. त्यानुसार आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या प्रयत्नांमुळे चिखले गावात अनेक विकासाची कामे मंजुर झाली असून त्यांचे सोमवारी भुमीपूजन तसेच भारीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले.
या वेळी एक कोटी 86 लाख रुपयांच्या निधीमधून चिखले फाटा ते मोहो या 3.5 किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण, 50 लाख रुपयांच्या निधीमधून चिखले येथे अंतर्गत गल्ली व रस्ते काँक्रीटीकरण, 20 लाख रुपयांच्या निधीमधून चिखले येथे वॉर्ड क्रमांक 2 मध्ये नवीन विद्युत ट्रान्सफार्मर, 13 लाख रुपयांच्या
निधीमधून चिखले येथे नवीन व्यायाम शाळा, 11 लाख 25 हजार रुपयांच्या निधीमधून चिखले येथे नवीन अंगणवाडी, 10 लाख रुपयांच्या निधीमधून चिखले येथे जिल्हा परिषद शाळेची दुरुस्ती, 10 लाख रुपयांच्या निधीमधून चिखले येथील गणपती विसर्जन घाटाचे सुशोभीकरण आणि 10 लाख रुपयांच्या निधीमधून चिखले येथील नदीला संरक्षण भिंत बांधण्यात येणार आहे.
या कामांच्या भुमीपूजनावेळी भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ
भगत, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, पनवेल पूर्व मंडळ अध्यक्ष भुपेंद्र पाटील, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, युवामोर्चा अध्यक्ष योगेश लहाने, माजी सरपंच नामदेव पाटील, माजी उपसरपंच रमेश गडकरी, भाजप युवामोर्चाचे जिल्हा अध्यक्ष आनंद
ढवळे, रविंद्र गडकरी, बुथ अध्यक्ष गणेश पाटील, सदस्य अविनाश पाटील, मानसी शेळके, वर्षा पंडित, रेणुका चौधरी, नामदेव कान्हा पाटील, नामदेव पदू पाटील, गोमा पाटील, विजय धांग्रेकर, अरुल पाटणकर, दत्तात्रेय पाटणकर, संजय गडकरी, संजय
शेळके, जगदिश बढे, जयदास म्हात्रे, निलेश शेळके, धीरज गडकरी, मिलींद शेळके, विनोद पंडित, संदिप पंडित,
रविंद्र मेढेकर, विश्वास मेढेकर, दत्तात्रेय गायकर, प्रसाद गायकर, शांताराम शेळके, स्वप्नील पाटील, दत्तात्रेय गडकरी, भालचंद्र पाटील, दिनेश पाटील, मच्छिंद्र पाटील, सुर्यकांत पाटील, निलेश भोपी, ग्रामविकास ईधकारी काळे मॅडम यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

उलवे नोडमध्ये रविवारी महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा सांस्कृतिक कार्यक्रम

भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे होणार वाटप पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि …

Leave a Reply