खारघर ः रामप्रहर वृत्त
खारघर शहर विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत वेगाने प्रगती करत आहे. नागरिकांना भेडसावणार्या समस्या सोडवण्याचा ठाम दृष्टिकोन समोर ठेवून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजप महायुती सातत्याने कार्यरत आहे. भविष्यातही विकासकामांचा हा वेग असाच कायम राहील, अशी ग्वाही माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी खारघरमध्ये प्रचारावेळी दिली.
पनवेल महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून महायुतीने आपली पूर्ण ताकद लावली आहे. खारघर प्रभाग क्रमांक 6मधील महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेश गणपत ठाकूर, समीर कदम, सोनल नवघरे आणि उषा अडसुळे यांच्या प्रचारार्थ सेक्टर 18 मधील गुरूकुल सोसायटीमध्ये प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.
निवडणुकीच्या रणधुमाळीत लोकनेते रामशेठ ठाकूर स्वतः मैदानात उतरल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. सेक्टर 18मधील प्रचार फेरी आणि कोपरा सभेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भाजपचे ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे, जितेंद्र म्हात्रे यांच्यासह भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी खारघरच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून शहराचा कायापालट केला आहे. विकासाचा हा वारसा पुढे नेण्यासाठी प्रभाग 6मधील महायुतीच्या चारही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन या वेळी करण्यात आले.
Check Also
आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश
पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …
RamPrahar – The Panvel Daily Paper