Breaking News

जनतेची दिशाभूल करणार्‍या प्रवृत्तींनादूर ठेवा -आमदार प्रशांत ठाकूर


पनवेल : रामप्रहर वृत्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सबका साथ, सबका विकास हे व्हिजन घेऊन भारतीय जनता पक्ष महायुती खारघरसह संपूर्ण पनवेल महानगरपालिका क्षेत्रात विकासाची गंगा पोहचवत आहे. महापालिकेच्या माध्यमातून आरोग्य आणि पायाभूत सुविधांची अनेक कामे मार्गी लागली आहेत, मात्र ज्यांना केवळ पदे हवी आहेत आणि ज्यांना पदाशिवाय काहीच दिसत नाही, अशा संधीसाधूंनी भाजपची सोडून वेगळी वाट धरली आहे. जनतेची दिशाभूल करणार्‍या अशा प्रवृत्तींना वेळीच ओळखून त्यांना दूर करा, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी खारघर येथील प्रभाग क्रमांक 6 मध्ये आयोजित प्रचारादरम्यान केले.
पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 6 मधील महायुतीचे उमेदवार उषा अजित अडसुळे, नरेश गणपत ठाकूर, सोनल अजिंक्य नवघरे आणि समीर श्रीकांत कदम यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी भव्य रॅली काढण्यात आली होती.
या वेळी खासदार धैर्यशील पाटील आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी या परिसरात जोरदार शक्तीप्रदर्शन केले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, भाजपचा कार्यकर्ता महायुतीच्या विजयासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे. खारघरचा विकास हा केवळ महायुतीच्या खंबीर पाठबळामुळेचशक्य झाला असून, आगामी काळातही नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने तत्पर राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
प्रचारात सहभागी झालेले खासदार तथा भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनीही महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. प्रभाग 6 मधील मतदारांचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, या ठिकाणी पुन्हा एकदा कमळ फुलण्यासाठी प्रत्येक नागरिक सज्ज झाला असल्याचे चित्र दिसत आहे.
या प्रचार दौर्‍यावेळी आमदार विक्रांत पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राष्ट्रवादीचे शिवदास कांबळे यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …

Leave a Reply