हातरिक्षा संघटना सदस्यही दाखल; आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले स्वागत
माथेरान, पानवेल : प्रतिनिधी
माथेरानचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून भारतीय जनता पक्ष काम करीत आहे. हातरिक्षा चालक हे पर्यटनस्थळाच्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाचा घटक असून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन आणि भाजप कटिबद्ध आहे. आगामी काळात तुम्हाला अधिकाधिक शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही भाजप प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांनी येथे आयोजित कार्यक्रमात दिली.
माथेरानमधील माजी नगरसेवक दिनेश सुतार, संतोष लखन आणि संतोष शिंदे यांनी शनिवारी (दि. ११) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी माथेरानमधील हातरिक्षा संघटनेच्या सदस्यांनीदेखील ‘कमळ’ हाती घेतले. या सर्वांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षात स्वागत केले. त्यावेळी ते बोलत होते.
पनवेल येथील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमाला भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माथेरानचे उपनगराध्यक्ष संतोष शेलार, भाजप शहर अध्यक्ष व नगरसेवक प्रवीण सकपाळ, माजी उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, चंद्रकांत जाधव, उपाध्यक्ष किरण चौधरी, सरचिटणीस तथा माथेरान व्यापारी फेडरेशनचे अध्यक्ष राजेश चौधरी, माजी नगरसेवक प्रदीप घावरे यांच्यासह पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते व विद्यमान नगरसेवक परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, भाजप पनवेल शहराध्यक्ष व नगरसेवक सुमित झुंजारराव, महिला व बालकल्याण सभापती ममता म्हात्रे, नगरसेवक गणेश कडू, नगरसेविका प्रीती जॉर्ज आदी उपस्थित होते.
यावेळी माथेरानमधील माजी नगरसेवक दिनेश सुतार, संतोष शिंदे, संतोष लखन यांच्यासह हातरिक्षाधारक दिप्ती गणेश सुतार, भारत कारंडे, संतोष लखन, आशिष सावंत, गणेश कांबळे, सुमन रावखंडे, झहूर चिपाडे, बबन शेलार, शैलेश शेलार, रोशन मुर्तझा, उज्ज्वला राणे, चंद्रकांत चावरे, अनिता चावरे, सुनील कोळी, संगीता कोळी, संतोष शिंदे, तुषार जांभळे, शिवाजी साळुंखे, अफजल डोंगरे, संतोष निचिंदे, प्रवीण गायकवाड, मनोज रेणोसे, अक्षय सकपाळ, अल्ली डोंगरे, अरफार शेख, शहजाद शेख यांनी आपल्या कुटुंबासह विकासाचे ‘कमळ’ हाती घेतले. या सर्वांचे भाजपमध्ये स्वागत करण्यात आले.
RamPrahar – The Panvel Daily Paper