खालापूर : प्रतिनिधी
पुण्याकडे जाणाऱा महाकाय कंटेनर खालापूर तालुक्यातील वावंढळ गावाजवळ आडवा झाल्याने गुरुवारी (दि.11) दुपारी मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.
खालापूर तालुक्यातील चौक वावंढळ गावाजवळच्या अरुण हॉटेलसमोर पुण्याकडे जाणाऱा महाकाय कंटेनर गुरूवारी दुपारी महामार्गाच्या दोन्ही लेनवर आडवा झाला. त्यामुळे महामार्गावर वाहनांचा खोळंबा झाला. सुमारे एक तास वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान, खालापूर पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने कंटेनर बाजूला केल्यानंतर मुंबई व पुण्याकडे जाणारी वाहतूक सुरळीत झाली.