Breaking News

एजे क्रिकेट अकादमीकडे टीआयपीएल सिझन बॉल क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद

पनवेल : रामप्रहर वृत्त
एजे क्रिकेट अकादमीने ॲडव्हान्स क्रिकेट क्लबला नमवत सोसायटी क्रिकेट क्लब यांच्या वतीने ‘टीआयपीएल सिझन ३ अंडर १९’ या भव्य सिझन बॉल क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. त्यांना भारतीय जनता पक्ष रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या हस्ते गौरवण्यात आले.
पनवेल शहरातील मिडल क्लास सोसायटीच्या मैदानात रंगलेल्या यास्पर्धेत एकूण १६ संघ सहभागी झाले होते. ११ एप्रिल ते २४ एप्रिल दरम्यान आयोजित या स्पर्धेत एजे क्रिकेट अकादमी व ॲडव्हान्स क्रिकेट क्लब यांच्यात अंतिम सामन्यात रंगला. यात एजे क्रिकेट अकादमीने बाजी मारली. त्यांना ६० हजार रुपये व भव्य चषक देऊन गौरवण्यात आले. तर ॲडव्हान्स क्रिकेट क्लबने द्वितीय क्रमांक मिळवत ४० हजार रुपयांचे पारितोषिक मिळवले. तर क्रिश पाटील याने मालिकावीर, पार्थ पवार सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक, अवी जैन सर्वोत्कृष्ट गोलंदाज, आर्यन निकाळजे याने सर्वोत्कृष्ट फलंदाजचा मान पटकावला.
यावेळी भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, आयोजक व नगरसेवक सुमित झुंझारराव, भाजप नेते अमित ओझे, उल्हास झुंजारराव, रूपेश नागवेकर यांच्यासह खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

पनवेलच्या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा पाठपुरावा

मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा आणि त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न …

Leave a Reply