Breaking News

थोर समाजसुधारक स्व.जनार्दन भगतसाहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त समाजोपयोगी कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त
कष्टकऱ्यांचे द्रष्ट नेते थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांच्या 38व्या पुण्यतिथी निमित्ताने लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत पनवेल तालुकास्तरीय “स्व. जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार 2026 स्पर्धा, “श्रीमंत योगी’ महानाट्य, त्याचबरोबरीने नवनिर्वाचित महापौर, उपमहापौर, सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य त्याचबरोबरीने उरण उपनगराध्यक्ष यांचा सत्कार सोहळा अशी विविध समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांची नियोजन बैठक लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत उलवे नोडमध्ये पार पडली.
रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये झालेल्या या बैठकीस प्रमुख मान्यवर म्हणून माजी नगराध्यक्ष व ज्येष्ठ नेते जे.एम.म्हात्रे, पनवेल महापालिकेचे महापौर नितीन पाटील, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे सचिव परेश ठाकूर, संस्थेचे संचालक अनिल भगत, ज्येष्ठ नेते जयंत पगडे, भाऊशेठ पाटील, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे, पनवेल महापालिकेचे गटनेते प्रकाश बिनेदार, माजी पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत, वसंतशेठ पाटील, जिल्हा परिषद सदस्या निकिता खारकर, पंचायत समिती सदस्य जिज्ञासा कोळी, वितेश म्हात्रे, प्रकाश भगत, कामगार आघाडीचे प्रदेश सचिव संजय भगत, अजय भगत, विश्वनाथ कोळी, विजय घरत, जितेंद्र म्हात्रे, स्वप्नील ठाकूर, जयवंत देशमुख, ॲड. राहुल घरत, सी. एल. ठाकूर, अनिल देशमुख, नाना देशमुख, व्ही. के. ठाकूर, पी.के.ठाकूर, यांच्यासह जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे पदाधिकारी व पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.
जनार्दन भगत साहेबांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील कार्य अफाट राहिले असून त्यांनी अहोरात्र लोकांची सेवा केली. आयुष्यापेक्षा ध्येय्य मोठे असले पाहिजे, ही शिकवण त्यांनी समाजामध्ये रुजवत फक्त राजकारण नाही तर सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. त्याचबरोबर देवदूताची भूमिका सुद्धा पार पाडत त्यांनी समाजाला न्याय दिला आहे. त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या नावाने स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार या वर्षीही देण्यात येणार आहे. त्यानुसार तालुक्यातील ग्रामपंचायतींचे स्वच्छतेच्या निकषावर सर्वेक्षण करण्यात येत आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना 07 मे रोजी उलवा नोडमधील रामशेठ ठाकूर मैदान येथे होणाऱ्या पुण्यतिथी कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. त्याचबरोबरीने “श्रीमंत योगी’ महानाट्य”, तसेच नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा सत्कार सोहळा या आयोजित कार्यक्रमाचा नियोजन आढावा घेण्यात आला.

Check Also

भाजपकडून महिला सक्षमीकरणासाठी बळ दिले जाते -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष नेहमीच महिलांना शक्ती देण्याचे आणि त्यांना सक्षम करण्याचे काम …

Leave a Reply