रसायनी : प्रतिनिधी
चंदिगड येथील चित्रकारा विद्यापीठ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्कूल पारितोषिक समारंभामध्ये रसायनीची पायल भारद्वाज हिला आयएसए 2019 ग्लोबल अॅवॉर्ड विनरच्या वतीने सन्मानित करण्यात आले. आयएसएच्या या संमेलनामध्ये पाचशेपेक्षा जास्त विश्वसनीय स्कूल आणि एक हजारपेक्षा जास्त शिक्षणवादी आणि एज्युकेशनल स्टार्टअप यांनी सहभाग घेतला होता.
या समारंभामध्ये पायल भारद्वाज हिने स्कूल ऑफ कॉन्सलिंगया संस्थेद्वारे मुलांना काऊन्सलिंग देण्याची संस्था स्थापन केली. त्याचप्रमाणे प्रेरणादायी वक्ता असल्यामुळे तिने वेगवेगळ्या शहरात जाऊन काऊन्सलिंगच्या विषयी जागृती निर्माण केली. कारमेल काँन्व्हेन्ट स्कूल, प्रिआ स्कूल, सरस्वती स्कूल, सर सय्यद आणि रामशेठ ठाकूर यांसारख्या स्कूलमध्ये जाऊन विद्यार्थ्यांच्या विकासासाठी निरंतर काम करत आहे. सोक काऊन्सलिंग समितीद्वारा सध्या त्यांनी मोबाईल अॅपचे उद्घाटन केले. त्यामुळे विद्यार्थ्यांना फ्री ऑनलाईन काऊन्सलिंगच्या सेवेचा लाभ मिळेल. एवढ्या कमी वेळात विद्यार्थ्यांच्या या विकासामध्ये याचे योगदान जास्तप्रकारे विस्तारीत केल्याचे पाहत आंतरराष्ट्रीय विद्यालय पुरस्कारसारख्या प्रतिष्ठित संस्थेने त्यांच्या कार्याचे कौतुक करीत त्यांना ‘दूरदर्शी उद्योगिनीचा’पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार पायल भारद्वाज हिला अफगाणिस्तानचे शिक्षणमंत्री डॉ. अताउल्ला वाडीयार, तसेच भारताचे देवदूत डॉ.दीपक वोहरा यांनी दिला. आयएसएच्या या पुरस्कार सोहळ्याला 51 देशांमधून 9577 नामांकन आले होते. यात पायलने सुयश प्राप्त केले.