Breaking News

गाढी नदीवर पुलाचे काम लवकरच सुरू होणार!

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश

पनवेल : देवद-सुकापूर येथील गाढी नदीवरील पुलाचे काम सुरू करण्यासाठी आता मंजुरी मिळाली आहे. तशा आशयाची वर्क ऑर्डर सिडको प्रशासनाने काढली आहे. या कामासाठी लागणारा निधी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोचे अध्यक्ष असताना मंजूर केला होता. सिडकोचे अध्यक्ष असताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी या परिसराची पाहणी करून, गाढी नदीवरील देवद ते नवीन पनवेल आणि विचुंबे ते नवीन पनवेल अशा दोन पुलाच्या कामांसाठी निधी मंजूर केला होता. यापैकी गाढी नदीवरील देवद ते नवीन पनवेल या पुलाच्या कामाची सिडकोने नुकतीच वर्क ऑर्डर काढली आहे. या पुलांच्या उभारणीसाठी 11 कोटी 67 लाख सहा हजार 44 रुपये एवढा खर्च येणार आहे. हा पूल 18 महिन्यांत उभा राहणार असल्याचे सिडकोने आपल्या वर्क ऑर्डरमध्ये म्हटले आहे. गाढी नदीवरील या पुलामुळे परिसरातील नागरिकांच्या दळणवळणाची समस्या सुटणार असून विचुंबे येथे जाणार्‍या नागरिकांना होणारा प्रवासाचा त्रासही कमी होणार आहे.
सुकापूर येथील ग्रामस्थ आणि या पुलाच्या कामामुळे ज्यांना प्रवासासाठी सुविधा निर्माण होणार आहेत त्या नागरिकांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना धन्यवाद दिले आहेत. ‘पनवेलचे कार्यक्षम आमदार प्रशांत ठाकूर यांनी विकासासाठी शब्द दिला आणि तो पूर्णही करून दाखविला आहे. त्याबद्दल त्यांचे आभार,’ असे सुकापूर येथील जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव यांनी सांगितले.

Check Also

36 घंटे @50; दीड दिवसाचे थरार नाट्य

हिंमत सिंह (सुनील दत्त), त्याचा भाऊ अजित सिंह (रणजीत) आणि या दोघांचा साथीदार दिलावर खान …

Leave a Reply