Breaking News

मनसे, शेकाप पदाधिकार्‍यांचा भाजपमध्ये प्रवेश

आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले स्वागत

पनवेल ः रामप्रहर वृत्त
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षात इनकमिंग सुरू असून महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे पनवेल महानगरप्रमुख गणेश सरवणकर आणि शेतकरी कामगार पक्षाचे युवक पदाधिकारी आदित्य हरिश्चंद्र शेळके, सुरज सवदे यांनी रविवारी (दि.31) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी या पक्षप्रवेशकर्त्यांचे स्वागत केले.
भाजपचे विचार आणि कार्यपद्धती पाहून विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपच्या राष्ट्रीय प्रवाहात दाखल होत आहेत. पनवेलमध्येही आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विकासकामांवर प्रभावित होऊन युवावर्ग भाजपकडे आकर्षित होत आहे.
उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या या पक्षप्रवेशावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, प्रकाश बिनेदार, दीपक बेहेरे, कळंबोली शहराध्यक्ष रविशेठ पाटील, कामोठे अध्यक्ष रवींद्र जोशी, खारघर अध्यक्ष प्रवीण पाटील, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, सरचिटणीस अभिषेक भोपी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply