खालापूर : प्रतिनिधी : मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरील लोधिवली (ता. खालापूर)गावाच्या हद्दीत रविवारी (दि. 16) संध्याकाळी अतिवेगात जाणार्या कारने पुढे असलेल्या फोर्चुनार गाडीला धडक दिली, त्यामुळे फोर्चुनार गाडी तिच्या पुढे असलेल्या कारवर धडकल्याने ती कार संरक्षण कठडा तोडून दुसर्या लेनच्या बाजूला जावून अडकली. त्यावेळी या कारला पाठीमागून आलेल्या कारने जोरदार धडक दिली. या विचित्र अपघातात पाचही वाहनांचे मोठे नुकसान झाले. या अपघातात किरकोळ जखमी झालेल्या दोघांना पनवेलयेथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Check Also
युवा नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत हेल्मेट वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्तभाजपचे युवा नेते, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते व विद्यमान नगरसेवक परेश …
RamPrahar – The Panvel Daily Paper