Breaking News

कराटेपटू गोपाळ म्हात्रे राष्ट्रीय गौरव पुरस्काराने सन्मानित

उरण : प्रतिनिधी मुंबई येथे प्रियदर्शनी फाऊंडेशनच्या तृतीय वर्धापन दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणार्‍या युवक व युवतींना  भारत अस्मिता गौरव राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये उरण तालुक्यातील सारडे येथील गोसिन रियु कराटे असोशिएशनचे गोपाळ दिनकर म्हात्रे, अमिता अरुण घरत, आमिषा अरुण घरत (केळवणे, ता. पनवेल) यांनी क्रीडा क्षेत्रात उलेखनिय कामगिरी केल्याबद्दल सिने-नाट्य अभिनेत्री शिल्पा वाकडे, प्रियदर्शनी फाऊंडेशनचे अध्यक्ष आश्विन राणे व सामाजिक कार्यकर्ते सुरज भोईर या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा भारत अस्मिता गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला, तर गोसीन रियु कराटे असोसिएशनचे गोपाळ म्हात्रे यांनी तालुक्यात अनेक कराटेपटू घडविले असून, विभागातील शेकडो विद्यार्थी आजही त्यांच्याकडे कराटे प्रशिक्षण घेत आहेत. त्यामुळे त्यांना मुंबई येथे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले. गोपाळ म्हात्रे या एका खेड्यातील व्यक्तिमत्त्वाचा मुंबई येथे मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मान झाल्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply