Breaking News

राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर पडण्याचा भारताचा इशारा

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

’बर्मिंगहॅम येथे 2022 मध्ये होणार्‍या राष्ट्रकुल स्पर्धेतून नेमबाजी आणि तिरंदाजीला वगळण्यात आल्याने भारताने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. महिन्याभरात या दोन्ही खेळांसंबंधी निर्णय न घेतल्यास भारत राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर पडेल’, असा इशारा भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सचिव राजीव मेहता यांनी दिला आहे.

राष्ट्रकुल स्पर्धेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. भारताला नेहमीच चुकीच्या निर्णयाचा फटका बसला आहे. पदक मिळवण्यासाठी नेमबाजी हे भारतासाठी सर्वात मोठे स्त्रोत आहे. या खेळाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. आम्हाला माहीत आहे की, एखादा निर्णय मागे घेणे अवघड आहे. परंतु, पुढील महिन्यात राष्ट्रकुल स्पर्धासंबंधी सदस्यांची (कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशन) बैठक होणार आहे. या बैठकीत काय निर्णय होतोय, हे पाहावे लागले, असे राजीव मेहता यांनी सांगितले. राष्ट्रकुल फेडरेशनच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत 2022 च्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून नेमबाजी आणि तिरंदाजीला वगळण्याचा निर्णय घेतला होता. तसेच महिला क्रिकेट, बीच व्हॉलीबॉल आणि पॅरा टेबलटेनिस या तीन नव्या खेळांना या स्पर्धेत स्थान देण्यात आले आहे. तत्कालिन क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी राष्ट्रकुल फेडरेशन आणि स्पर्धा संयोजकांना नेमबाजी खेळ स्पर्धेत राहावा, यासाठी गेल्या वर्षी पत्र लिहिले होते. नेमबाजी खेळ बाहेर ठेवल्यामुळे भारताला मोठा धक्का बसला आहे. 2018च्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला 66 पैकी 16 पदके ही नेमबाजीतून मिळाली होती.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply