दोन सदस्य बिनविरोध
कडाव : प्रतिनिधी
सार्वत्रिक निवडणुकीत बिनविरोध निवडून येत कर्जत तालुक्यातील वाकस ग्रामपंचायतीमध्ये प्रथमच भाजपचे कमळ फुलविणार्या दोन सदस्यांचे पक्षाचे जिल्हा चिटणीस तथा वाकस ग्रामपंचायत प्रभारी रमेश मुंढे यांनी अभिनंदन केले.
थेट सरपंच आणि नऊ सदस्यांच्या वाकस ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक 31 ऑगस्ट रोजी होत आहे. या निवडणुकीत भाजपच्या रंजनाताई विठ्ठल भागित (प्रभाग क्र. 1) आणि सुबोध सुधाकर जगे (प्रभाग क्र. 3) हे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. भाजपचे जिल्हा चिटणीस तथा वाकस ग्रामपंचायत प्रभारी रमेश मुंढे यांनी विजयी उमेदवारांच्या निवासस्थानी जावून त्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे तालुका उपाध्यक्ष गौतम मुंढे, कर्जत शहर उपाध्यक्ष प्रकाश पालकर, ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्ष संतोष भोईर, तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर भगत, राजेंद्र जाधव, गुरुनाथ सोनावणे, विठ्ठल भागित, हरेश सोनावले, प्रशांत शहाणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.