Breaking News

सीकेटी विद्यालयाचे गायन स्पर्धेत सुयश

पनवेल : प्रतिनिधी  : पनवेल-उरण आगरी समाज मंडळातर्फे दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांच्या सहाव्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित पोवाडा गायन स्पर्धेमध्ये नवीन पनवेल येथील मराठी माध्यमाच्या चांगू काना ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने द्वितीय पारितोषिक मिळविले. रोख रकम रु. 2000 व सन्मानचिन्ह असे पारितोषिकाचे स्वरूप आहे.

स्पर्धेमध्ये सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षिका वीणा कुलकर्णीं, राधिका शिर्के, संतोष खरे यांचे विद्यालयाचे प्रा. डॉ. नंदकुमार जाधव, पर्यवेक्षिका इंदूताई घरत, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूऱ, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख तसेच संस्थेच्या कार्यकारिणी मंडळाच्या सर्व सदस्यांनी अभिनंदन केले.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply