मुरुड ः प्रतिनिधी
येथील सार्वजनिक वाचनालय आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमाचे उद्घाटन वाचनालयाचे अध्यक्ष अनिल कारभारी यांच्या हस्ते झाले. ही दिवाळी पहाट मैफल रंगली. रसिकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. या वेळी उपाध्यक्ष केदार गद्रे, कार्यवाह विनय मथुरे, संस्कृती समिती अध्यक्ष अस्मिता पेंडसे, नितीन पाटील, निवास रसाळ, ग्रंथपाल संजय भायदे, ज्येष्ठ गायक रवींद्र नामजोशी व सिनेकलावंत शैलेश पालशेतकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक सुरेश सदरे आणि मंडळी यांच्या भावगीते, चित्रपटगीते, गझल, अभंग अशा संगीत मेजवानीने मुरुडकर मंत्रमुग्ध झाले. वाचनालयाने 11 वर्षांपूर्वी दिवाळी पहाट कार्यक्रम सुरु केला. गेल्या चार वर्षांप्रमाणे सुरेश सदरे आणि सिद्देश करंबे, सुप्रभा आरेकर, विद्या चौलकर, आदित्य बागुल, राहुल वर्तक, पूजा सदरे, मनोहर बुडबडकर अशा आठ गायकांनी विविध रसातील गाणी सादर करून दिवाळी पहाट रम्य केली. दिवाळी पहाट कार्यक्रमात मृदूंगसाथ महेश सुर्वे व पेटीवर मंदार मुंबईकर यांनी साथ दिली. तर निवेदन अस्मिता पेंडसे यांनी केले.