Breaking News

सोने व्यवसायावर विपरीत परिणाम

खोपोली : प्रतिनिधी 

सध्या जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूची लागण टाळण्यासाठी शासनातर्फे विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण असून, नागरिकांनी ऐन लग्नसराईत सोने खरेदी टाळल्यामुळे सोने व्यवसायावर विपरित परिणाम झाला आहे. आठवडाभरात सोन्याच्या दरात प्रति तोळा पाच हजार रुपयांची घसरण झाल्याने खोपोलीतील सोने व्यवसायावर संक्रांत आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

राज्यात कोरोनाचे अनेक रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाने घराबाहेर पडू नये, असे आवाहन केल्याने नागरिक बाहेर पडण्यास घाबरत आहेत. सध्या लग्नसराईचे दिवस आहे, मात्र सोन्याच्या दुकानांमध्ये पाहायला मिळणारी गर्दी कमी झाली असून, सोन्याची दुकाने ओस पडल्याचे चित्र खोपोलीत पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे अन्य व्यवसायांसह सोन्याचा व्यवसायही ठप्प झाला आहे.

दोन तीन दिवसांपासून ग्राहक फिरकले नसल्याने व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. गेल्या आठवडाभरात सोन्याचा भाव प्रती तोळा पाच हजारहून कमी झाला आहे.

-अरविंद जैन, सोने व्यापारी, खोपोली

लग्नसराई असली आणि सोन्याचे भाव कमी झाले असले तरी, कोरोनाच्या भीतीने आम्ही घराबाहेर पडणे टाळत आहोत. अन्य प्रकारची खरेदीही करत नसताना, सोन्याची खरेदीही अशक्यच आहे. -सुधीर पिंगळे, स्थानिक नागरिक, खोपोली

Check Also

उरणमधील ‘उबाठा’, शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार महेश बालदी यांच्याकडून स्वागत उरण : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब …

Leave a Reply