Breaking News

पनवेल बार असोसिएशनकडून चव्हाण यांना श्रद्धांजली

पनवेल ः रामप्रहर वृत्त – ज्येष्ठ विधीतज्ज्ञ स्व. ई. ए. चव्हाण यांचे नुकतेच 73व्या वर्षी निधन झाले. पनवेल बार असोसिएशनच्या वतीने येथील बार रुममध्ये शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी न्यायाधिश रावसाहेब, भााकरे, पाठक, मुजावर, स्वामी तसेच बार असोसिएशानचे अध्यक्ष मनोज भुजबळ व अन्य वकील उपस्थित होते. यावेळी ई. ए. चव्हाण यांच्याविषयी सहकार्‍यांनी भावना व्यक्त केल्या. त्यांच्या निधनाने पनवेल बार असोसिएशनमध्ये पोकळी निर्माण झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply