नागोठणे : प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत नागोठणे ग्रामपंचायतीने आपल्या हद्दीत वृक्ष लागवड करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला असून, त्याचा शुभारंभ मंगळवारी (दि. 9) सकाळी करण्यात आला. जि. प. सदस्य किशोर जैन, रोहे पं.स. सभापती राजश्री पोकळे, पं. स. सदस्य संजय भोसले, नागोठणे सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, उपसरपंच सुप्रिया महाडिक, सर्व ग्रामपंचायत सदस्य, तालुका कृषी अधिकारी महामुनी, ग्रामविकास अधिकारी मोहन दिवकर, परिमंडळ अधिकारी वसंत जाधव, कीर्तिकुमार कळस, सुरेश गायकवाड आदींसह प्राथमिक शाळांचे शिक्षक आणि नागरिक यावेळी उपस्थित होते. नागोठणे शहरात यावर्षी तीन हजार 250 रोपे लावण्याचे ग्रामपंचायतीचे उद्दिष्ट असून शहराच्या विविध भागात ती लावण्यात येणार असल्याचे सरपंच डॉ. धात्रक यांनी यावेळी स्पष्ट केले.
Check Also
पनवेलमध्ये गुरुवारी ’संदीप वैभव…आणि कविता’
कुसुमाग्रज जयंती व मराठी राजभाषा गौरव दिननिमित्त कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्तज्येष्ठ कवी विष्णू वामन …