मुरूड : प्रतिनिधी
तालुक्यातील मजगाव ग्रामपंचायततर्फे पाच हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी शिसव, आवळा, चिंच, राजवला, सीताफळ, गुलमोहर आदी प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. या मोहिमेत नांदगाव हायस्कूल आणि मजगाव प्राथमिक शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते.
सरपंच पवित्रा चोगले व ग्रामपंचायत सदस्य अमित कोळी यांच्या हस्ते नवीन मजगाव परिसरात वृक्ष लागवड करून या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपसरपंच प्रीतम पाटील, ग्रामविकास अधिकारी प्रदीप दिवकर, ग्रामपंचायत सदस्य विजया जमनू, निविता सुर्वे, अभिनव कोळी, संतोष जमनू, संतोष बुल्लू, अनंत कांबळी, निखिल मानाजी, नांदगाव हायस्कूलचे शिक्षक योगेश पाटील, महेश वाडकर, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी सरपंच पवित्रा चोगले, ग्रामपंचायत सदस्य अमित कोळी यांनी मार्गदर्शन केले.