पनवेल : रामप्रहर वृत्त
उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून आणि पुढाकाराने तालुक्यात नागरी सुविधांचे जाळे विस्तारत असून नागरिकांना अद्ययावत सेवा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर दिला जात आहे. याचाच एक भाग म्हणून रायगड जिल्हा परिषद आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पनवेल तालुक्यातील कल्हे येथे नूतन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र साकारण्यात आले आहे.
या उपकेंद्राच्या प्रशस्त मुख्य इमारतीचे लोकार्पण गुरुवारी (दि.२६) आमदार महेश बालदी यांच्या हस्ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांची प्रमुख उपस्थितीत झाले. हे अद्ययावत केंद्र सुरू झाल्यामुळे स्थानिकांना त्यांच्या परिसरात दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहेत.
लोकार्पण सोहळ्याला पनवेल पंचायत समितीच्या सभापती रंजना वास्कर, सदस्य मयूर शेलार, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत, माजी सरपंच सदाशिव वास्कर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अपर्णा पवार, जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. दामोदर मोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. उन्नती चव्हाण, अक्षता पाटील यांच्यासह विविध विभागांचे शासकीय अधिकारी, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या समन्वयातून उभे राहिलेले हे आरोग्य उपकेंद्र म्हणजे कल्हे पंचक्रोशीतील विकासकामांचा एक महत्त्वाचा टप्पा असून या सुविधेमुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
Check Also
अमर भूपाळी होनाजी बाळा @७५ वर्षे : एक संगीतमय अजरामर कलाकृती
भारतीय चित्रपटसृष्टीच्या वाटचालीतील काही दर्जेदार (क्लासिक) चित्रपट पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात आणि त्यात पुनर्प्रत्ययाचा आनंद …
RamPrahar – The Panvel Daily Paper