Breaking News

महेश बालदी-द प्रोटॉन मॅन

एखादे काम करायचे असेल तर त्याला सतत पाठपुरावा आणि मानसिकता आवश्यक असते. त्याच अनुषंगाने अनेक वर्षे प्रतीक्षेत असलेले उरणकरांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम भाजप नेते महेश बालदी यांनी पूर्ण करून आता उरणला स्मार्ट करण्याचा दृढनिश्चय केला आहे. प्रोटॉन कधीही आपली सकारात्मकता गमावत नाही, त्याचप्रमाणे उरणच्या विकासासाठी महेश बालदी प्रोटॉन आहेत, असे म्हटले तर ते कदापिही वावगे ठरणार नाही.

देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सब का साथ सब का विकास या कल्पनेच्या आधारावर काम करीत उरणमध्ये विकासाची गंगा आणण्याचे काम भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस तथा जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी सातत्याने करीत असून उरणमध्ये रोजगाराच्या संधी आणून उरण बेकारीमुक्त करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या विधायक कार्याचा वारसा त्यांनी जपत स्वतःला सर्व समाजाच्या कल्याणासाठी झोकून दिले आहे.

जेएनपीटी, एससीझेड, विमानतळ असे मोठे आणि विकासाला दिशा देणारे अनेक प्रकल्प कार्यान्वित होत असताना रोजगार हा मुख्य हेतू आहे. त्या अनुषंगाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मदतीने उरणला विकासमय करण्याचे ध्येय त्यांनी उराशी बाळगले आहे. भाजप सरकारच्या लोककल्याणकारी भूमिकेमुळे शहरांबरोबरच गावखेड्यातही विकास पोहचत आहे. त्या अनुषंगाने सदैव कार्यरत राहून उरणचा सर्वांगीण विकास हाच दृष्टिकोन ठेवून महेश बालदी सक्रिय आहेत.

जागतिक वारसा लाभलेले घारापुरी बेट विद्युत प्रकाशमान करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत. 69 वर्षांत झाले नाही ते अवघ्या दोन वर्षांत त्यांनी करून दाखविले आणि घारापुरी बेटाला नवसंजीवनी दिली. महाराष्ट्र भूषण तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी, पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर त्यांची दिव्य भक्ती आणि श्रद्धा आहे. त्यामुळे त्यांनी जेएनपीटीच्या माध्यमातून दास्तान फाटा येथे भक्ती, शक्ती आणि श्रद्धेचे संगम असलेले शिवसमर्थ स्मारक उभारण्याचा संकल्प करीत तो पूर्णही केला.  उरण तालुक्यात सीएनजी पंप स्टेशन सुरू होणे उरणकरांचे स्वप्न होते. ते महेश बालदी यांनी साकार केले. एलपीजी गॅस, उरण नगर परिषदेतील पायाभूत विकासकामे अशी अनेक विकासकामे करीत असतानाच गरजूंना रोजगार देण्याबरोबरच नागरिकांचे, कामगारांचे विविध प्रश्न सोडविण्याचे कामही ते प्रामाणिकपणे करीत आहेत.

उरण विधानसभा मतदारसंघात भाजप क्वचितच दिसायचा, पण महेश बालदी यांनी आपल्या कार्याने झपाटून काम करीत या भागात भाजप सक्षम केला. अनेक वर्षे शेकापच्या ताब्यात असलेल्या ग्रामपंचायती खेचून घेत त्या ठिकाणी भाजपचा झेंडा डौलाने फडकवला. त्यांनी केलेले कार्य आणि झपाट्याने वाढवलेल्या पक्षसंघटनेमुळे महेश बालदी सरस व्यक्तिमत्त्व असल्याचे सिद्ध झाले आहे. सूर्याची किरणे दिशा आणि उमीद देतात त्याचप्रमाणे उरणासाठी  महेश बालदी आशेचे किरण आहेत. त्यामुळे या विकासपुरुषाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी आपली सारी स्वप्ने साकार व्हावीत. आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी आणि त्या आठवणीने आपले आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावे, हीच शुभेच्छा! 

– कौशिक शहा, अध्यक्ष-उरण शहर भाजप

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply