पनवेल ः वार्ताहर
अरेंजा टॉवर इमारतीत घुसलेल्या एका अज्ञात व्यक्तीने सदर इमारतीत राहणार्या रत्ना शिवदास नायर (55) या महिलेला चाकूचा धाक दाखवून तिच्या जवळची 56 हजारांची रोख रक्कम लुटून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या वेळी लुटारूसोबत झालेल्या झटापटीत रत्ना नायर किरकोळ जखमी झाल्या आहेत. सीबीडी पोलिसांनी अज्ञात लुटारू विरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आहे. सीबीडी सेक्टर 11 मधील अरेंजा टॉवर इमारतीत रत्ना नायर कुटुंबासह राहाण्यास असून त्या घरामध्ये एकट्याच असताना, त्यांच्या ओळखीतला सोफा बनविणारा तरुण त्यांच्या घरी आला होता. सोफा बनविण्याच्या निमित्ताने रत्ना नायर यांची या तरुणासोबत तोंडओळख झाली होती. याचाच फायदा उचलत सदर लुटारू रत्ना नायर यांच्या घरी गेल्याने त्यांनी त्याला आपल्या घरामध्ये प्रवेश दिला. लुटारूने त्यांच्याशी गप्पा मारण्याचा बहाणा केला. नंतर संधी साधून चाकूचा धाक दाखवून त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. या वेळी रत्ना नायर आणि लुटारू यांच्यात झटापटही झाली, पण लुटारू पळण्यात यशस्वी झाला.