खांदा कॉलनी ः रामप्रहर वृत्त
ब्राह्मणसभा, नवीन पनवेल प्रस्तुत ‘युवोन्मेष’ या संस्थेेेचा सांस्कृतिक कार्यक्रम सीकेटी महाविद्याय, खांदा कॉलनीमधे मोठ्या जल्लोषात झाला. या वेळी विशेष प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सिडकोचे मुख्य अभियंता केशव वरखेडकर यांच्यासह ब्राह्मणसभा अध्यक्ष डॉ. अरविंद बेलापूरकर, उपाध्यक्ष शंकर आपटे, सचिव नृपाली जोशी, उपसचिव मृदुला वैशंपायन, खजिनदार दीपाली जोशी, सहखजिनदार सुरेंद्र कुलकर्णी आदी मान्यवरांसह रसिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यात युवोन्मेष ही युवा संघटना कार्यरत आहे. या संस्थेच्या माध्यमातून पनवेल परिसरातील वृद्धाश्रम, तसेच मागास व आदिवासी भागात विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात, तसेच युवकांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी प्रतिवर्षी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या वर्षी सादर झालेल्या कार्यक्रमात शास्त्रीय नृत्य, फ्यूजन, करा ओके गायन आदी सांस्कृतिक कार्यक्रम झाले.
संज्योत अंधारे, अनुजा कुलकर्णी, नेहा आपटे, स्वरांगी तारे, ऐश्वर्या भागवत, आदित्य पुंडे आणि चैैत्राली देसाई या कलाकारांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. मयूरेश साठे याने कलाकारांना तबला साथ केली. कल्याणी सदावर्ते हिने तांत्रिक सहकार्य केले. विश्वजित किराणे, प्रज्ञेश सदावर्ते, आदित्य बोधनकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.